Sat. Jun 19th, 2021

काय आहे मनोधैर्य योजना?

बलात्कार किंवा बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसनासाठी मदत करण्यासाठी मनोधैर्य ही विशेष योजना आहे. या योजनेनुसार पीडितांना जिल्हा किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतिम मंजुरीनंतर अर्थसहाय्य देण्यात येतं

मिळणाऱ्या अर्थसहाय्यापैकी 75% रक्कम पीडित किंवा त्याच्या अल्पवयीन वारसाच्या नावे 10 वर्षासाठी मुदत ठेवीच्या रुपाने बँकेत ठेवली जाणार.

25% रकमेचा त्यांना धनादेश मिळणार

बलात्कार विषयक घटनांमध्ये मानसिक धक्का किंवा कायमचे अपंगत्व आल्यास किंवा सामूहिक बलात्कार प्रकरणी महिलेस गंभीर व तीव्र स्वरूपाची शारीरिक इजा झाल्यास 10 लाखांपर्यंत मदत मिळणार

भूलथापा, फसवणूक, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार झाला असेल तर 1 लाखांपर्यंत मदत मिळते.

कौटुंबिक हिंसाचार अधिनियम- 2005 नुसार न्यायालयात फारकत किंवा घटस्फोट झाल्यानंतर पतीकडून महिलेच्या बाबतीत बलात्काराची घटना घडल्यास 1 लाखांपर्यंत मदत मिळते.

पॉक्सो अंतर्गत बालकांवर लैंगिक अत्याचार

पीडित बालकास / अल्पवयीन मुलीस मानसिक धक्का बसून कायमचे मतिमंदत्व/ अपंगत्व आल्यास अथवा गंभीर व तीव्र स्वरूपाची शारीरिक इजा झाल्यास रु. 10 लाखांपर्यंत मदत मिळते.

भूलथापा, फसवणूक, लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात 1 लाखांपर्यंत मदत देण्यात येते.

ॲसिड हल्ला

ॲसिड हल्ल्यासारख्या घटनेमध्ये पीडित महिला किंवा बालकाचा चेहरा विद्रूप झाल्यास तसंच शरीराच्या दृश्य भागाची हानी झाल्यास किंवा कायमचं अपंगत्व आल्यास 10 लाखांपर्यंत मदत मिळते.

ॲसिड हल्ल्यात जखमी झाल्यास 3 लाखांपर्यंत मदत मिळते.

बलात्काराच्या घटनेमुळे गंभीर इजा किंवा आजार अथवा HIV लागण झाली असेल तर त्यासाठी संबंधितास शासकीय रुग्णालयातून उपचार मोफत दिले जातात.

ॲसिड हल्ल्यात चेहरा विद्रूप झाल्यास करावयाच्या प्लास्टिक सर्जरी शासनाने निश्चित केलेल्या रुग्णालयात शासनाच्या खर्चाने उपचार मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *