Mon. Sep 20th, 2021

काय असतो ‘पोंगल’ सण?

पोंगल हा सण दक्षिण भारतात मोठ्या थाटातमाटात साजरा करतात. पोंगल आणि मकर संक्रांती 14 किंवा 15 जानेवारीला हे सण येतात. तामिळनाडू, केरळ, आंध्रपद्रेश, कर्नाटक या राज्यांत पोंगल सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. तर उत्तर भारतात मकर संक्रांती हा सण मोठ्या थाटातमाठात साजरा करतात.

जेव्हा सूर्य दरवर्षी हा मकर राशीमध्ये येतो तेव्हा या दिवसापासून पोंगल सण आणि मकर संक्राती सुरूवात होते. पोंगल हा सण तामिळनाडू चार दिवस साजरा करतात. तामिळ संस्कृतीमध्ये या सणाला फार महत्व आहे. हा सण शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा असतो.

या सणाच्या दिवशी सारे शेतकरी आणि कष्टकारी लोक सुर्याला धन्यवाद मानतात. विशेष म्हणजे पोंगल हा सण कृषी आणि पिकांशी संबंधित असतो. शेतकरी हे पहिली कापणी झाल्यानंतर देवांना धान्य अर्पित करतात आणि सुर्याला अन्नधान्याचा दाता मानून चार दिवस हा उत्सव साजरा करतात.

या उत्सावात गायीच्या दुधाला फार महत्व असते. या सणाच्या दिवशी घराबाहेर दूध नवीन भांड्यात उकळलं जातं आणि खीर बनवली जाते. याचा नवैद्य हा सूर्यदेवाला दाखवतात. या उत्सवात अनेक प्रकारची पक्वान्न घरी बनवतात.

पहिल्या दिवशी ‘भोगी’, दुसऱ्या दिवशी ‘सूर्य’ तिसऱ्या दिवशी ‘मट्ट’ आणि चौथ्या दिवशी कन्या ‘पोंगल’ साजरा करतात. या दरम्यान इंद्रदेव, सूर्यदेव, नंदी बैलाची पूजा करून कन्येची पूजा ही महाकली मंदिरात करतात. पोंगल सणाचा अर्थ अमावस्याप्रमाणे वाईट प्रथा सोडून चांगल्या गोष्टी करण्याचे वचन स्वीकारणे म्हणजे पोंगल याला ‘पोही’ देखील म्हणतात. दक्षिण भारतात पोंगल सणापासून नववर्षची सुरूवात होते.

पोंगल या सणात पहिल्या दिवशी पूर्ण घराजवळील कचरा एकत्र करून जाळतात. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. तिसऱ्या दिवशी पशुधनाची पूजा करून चौथ्या दिवशी कालीची पूजा केली जाते. हा सण दिवाळी प्रमाणे साजरा करतात. लक्ष्मी पूजा गोवर्धन पूजा गुरांची पूजा केली जाते. घराबाहेर रांगोळी काढली जाते. नवीन वस्त्रं आणि भांडी विकत घेतात. या सणाच्या दिवशी बैलाची शिंगं रंगवितात. बैल शर्यत होते.

पोंगल सणाविषयीच्या पौराणिक कथा ?

शिवशंकर त्यांच्या बैलाला भूतलावर संदेश घेऊन जाण्यास सांगतात.

संदेशात भगवान शिवशंकर म्हणतात की, मनुष्यांना सांग दररोज तेल लावून आंघोळ करायला आणि महिन्यातून फक्त एक दिवस मनुष्याला जेवण करायला सांग. मात्र बैलाने हा संदेश मनुष्याला उलटा सांगितलं. भगवान शिव यामुळे क्रोधीत होऊन त्यांनी बैलाला शाप दिला की तुला भूतलावर राहून मनुष्याची कृषी कामासाठी मदत करावी लागेल.

त्यामुळे पोंगल सणाला बैलांना महत्त्व असतं. पोंगल हा सण भारतातबाहेर श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर आणि युरोपियन देशांपैकी म्हणजेच दक्षिण आफ्रिका, मॉरिशस देशात साजरा करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *