Fri. Sep 30th, 2022

कोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ प्रकार नेमका काय? कशी घ्याल स्वतःची काळजी?

१५ जून रोजी ‘डेल्टा प्लस’ या नवीन कोरोना विषाणूच्या व्हेरिएंटच्या बातमीची चर्चा होऊ लागताच, अनेक नोएडा आरडब्ल्यूएने त्यांच्या सोसायट्यांमध्ये वैयक्तिकरित्या पुन्हा एकदा टाळेबंदी आणि निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. परिसरातील आयटी कंपनीचे मालक ३८ वर्षीय अनुपम मिश्रा म्हणतात, “मागच्या व्हेरियंटमध्ये काय घडले, हे आम्हाला माहित आहे. मग, आता आपण जोखीम का घ्यावी?” मिश्रा आणि त्यांच्या शेजाऱ्यांच्या या गेटेड अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये डिलिव्हरी बॉय किंवा आगंतुक येणार नाहीत.’ डेल्टा प्लस होण्याचा धोका टाळण्यासाठी ते स्वतः गेट बाहेर जाणे अधिक सुरक्षित मानतात

डेल्टा प्लस विषाणू पासून बचाव कसा करायचा?

व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, असं वार्ष्णेय यांनी सांगितलं.

लस प्रभावी आहे का नव्या वेरियंटवर ?

आपण आतापर्यंत वापरत असलेली लस वेरियंटवर प्रभावी आहे. बर्‍याच वेळा अशा प्रकारे अनुवांशिक बदलांमुळे व्हायरस नष्ट होतात. सार्स कोरोना व्हायरस अशाप्रकारे संपला होता. म्हणूनच, जेव्हा जेव्हा व्हायरस बदलतो तेव्हा फक्त धोका असतो, असं म्हणता येत नाही. कधीकधी ते खूप कमकुवत देखील होतात आणि त्याचा प्रभाव कमी होतो. नागरिकांनी कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता लस घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.