Wed. Oct 5th, 2022

विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी मविआचे गणित काय?

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होणार आहे.

महाविकास आघाडातील शिवसेनेचे ५५ आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ आमदार, आणि काँग्रेसचे ४४ आमदार असे मविआतील पक्षाचे एकूण १५२ इतके संख्याबळ आहे. तर, विधानपरिषद निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी २७ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे सहा उमेदवार जिंकण्यासाठी महाविकास आघाडीला १६२ मतांची गरज आहे. मात्र, मविआची एकूण मते १५२ आहेत. त्यामुळे मविआला अतिरिक्त १० मतांची गरज भासणार आहे.

विधानपरिषदेचे उमेदवार कोण आहेत?

शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि नंदूरबारचे स्थानिक शिवसेना नेते आमशा पाडवी रिंगणात उतरले आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर निवडणूक लढवत आहेत.


काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना संधी देण्यात आली आहे.


भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.