Sun. Jun 20th, 2021

#TripleTalaqBill तिहेरी तलाक नेमका आहे तरी काय? विधेयकाबद्दल जाणून घ्या थोडक्यात!

तिहेरी तलाख विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेतही मंजूर झालं आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल. अनेक वर्षांपासून हे विधेयक वादात अडकलं होतं. या विधेयकाच्या मंजुरीमुळे तिहेरी तिलाक हा फौजदारी गुन्हा ठरणार आहे.

तिहेरी तलाक म्हणजे काय?

तिहेरी तलाक ही मुस्लिमांची घटस्फोट घेण्याची पद्धत

तिहेरी तलाकलाच तलाक-ए-बिद्दत असंही म्हणतात

तिहेरी तलाकनं पती-पत्नीमध्ये तात्काळ घटस्फोट होतो.

अनेक मुस्लिम पुरुष या प्रक्रियेतून पत्नीला कायदेशीर तलाक देऊ शकतात.

केवळ ‘तलाक तलाक तलाक’ असं तीनवेळा म्हटल्याने पत्नीला ते घटस्फोट देऊ शकतात.

तिहेरी तलाक विरोधी कायदा काय असेल?

तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते

गुन्हा अजामीनपात्र असला, तरी खटला सुरू होण्यापूर्वी न्यायाधीशांकडून जामीन मिळवण्याचा आरोपीला अधिकार असेल

पोलिस ठाण्यातून जामीन मिळू शकणार नाही, पीडित महिलेची बाजू ऐकल्यानंतरच न्यायाधीश आरोपीला जामीन देऊ शकतील

पत्नीला नुकसानभरपाई देण्याची तयारी आरोपीने दर्शवल्यास न्यायाधीश त्याला जामीन देऊ शकतील

संबंधित महिलेने मान्यता दिल्यास याबाबतचा खटला न्यायाधीशासमोर जाण्यापूर्वी या गुन्ह्यात तडजोड केली जाऊ शकते

तिहेरी तलाक किंवा तलाक-ए-बिद्दतमध्ये पीडित महिला न्यायाधीशांकडे स्वतःसाठी व तिच्या मुलांसाठी निर्वाह भत्ता मागू शकेल

मुलांचा ताबा मागण्याचा अधिकारही महिलेला असेल

तिहेरी तलाक ही मुस्लिमांची घटस्फोट घेण्याची पद्धत

तिहेरी तलाकलाच तलाक-ए-बिद्दत असंही म्हणतात

तिहेरी तलाकनं पती-पत्नीमध्ये तात्काळ घटस्फोट होतो.

अनेक मुस्लिम पुरुष या प्रक्रियेतून पत्नीला कायदेशीर तलाक देऊ शकतात

तिहेरी तलाक विरोधी कायदा काय असेल?

तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते

गुन्हा अजामीनपात्र असला, तरी खटला सुरू होण्यापूर्वी न्यायाधीशांकडून जामीन मिळवण्याचा आरोपीला अधिकार असेल

पोलिस ठाण्यातून जामीन मिळू शकणार नाही, पीडित महिलेची बाजू ऐकल्यानंतरच न्यायाधीश आरोपीला जामीन देऊ शकतील

पत्नीला नुकसानभरपाई देण्याची तयारी आरोपीने दर्शवल्यास न्यायाधीश त्याला जामीन देऊ शकतील

संबंधित महिलेने मान्यता दिल्यास याबाबतचा खटला न्यायाधीशासमोर जाण्यापूर्वी या गुन्ह्यात तडजोड केली जाऊ शकते

तिहेरी तलाक किंवा तलाक-ए-बिद्दतमध्ये पीडित महिला न्यायाधीशांकडे स्वतःसाठी व तिच्या मुलांसाठी निर्वाह भत्ता मागू शकेल

मुलांचा ताबा मागण्याचा अधिकारही महिलेला असेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *