Mon. Jun 14th, 2021

आता व्हॉट्सअॅप मेसेजला ‘या’ सोप्या पद्धतीने द्या रिप्लाय

सध्याच्या काळात व्हॉट्सअॅप हे प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या अॅपचा वापर करतात. हे अॅप वापरणे सोपे व्हावे यासाठी कंपनीकडून सातत्याने विविध प्रयत्न होताना दिसतात. नुकताच व्हॉट्सअॅपने असाच एक बदल केला असून त्याद्वारे आपल्याला आलेल्या मेसेजला रिप्लाय करणे आणखी सोपे होणार आहे.

मात्र या फिचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागणार आहे. आपल्याला आलेल्या मेसेजला, फोटोला किंवा व्हिडियोला तुम्हाला रिप्लाय करायचा असेल त्यासाठी व्हॉटसअॅपने नव्याने सुविधा दिली होती. यामध्ये तुम्हाला विशिष्ट मेसेज सिलेक्ट करुन वरती असलेल्या बाणावर क्लिक केल्यावर रिप्लाय करण्याचा पर्याय होता. पण आता तेवढे करण्याचीही आवश्यकता नाही. कारण व्हॉट्सअॅपने आणलेल्या या नवीन फिचरद्वारे आता विशिष्ट मेसेजला रिप्लाय करणे आणखी सोपे होणार आहे.

आता अशा प्रकारे करा रिप्लाय

  • तुम्हाला एखाद्या मेसेजला रिप्लाय करायचा असेल तर वरच्या बाजूला असलेल्या बाणावर जाण्याची आवश्यकता नाही.
  • आता रिप्लाय करायचा असलेला मेसेज चॅट विंडोमध्ये उजवीकडे सरकवल्यास रिप्लायचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे एखाद्या ग्रुपमध्ये खूप मेसेज पडले असतील आणि तुम्हाला एकाच नेमक्या मेसेजला उत्तर द्यायचे असल्यास तुमचे कष्ट नक्कीच वाचणार आहेत. त्यामुळे आता व्हॉट्सअॅप वापरणे आणखी सोपे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *