व्हॉट्स ॲपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं पाऊल
जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य करणार असल्याचे व्हॉट्स ॲपने सुप्रीम कोर्टात स्पष्ट केलं आहे. व्हॉट्स ॲपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एका समितीची स्थापना केली आहे.
अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी या समितीची भेट घेऊन उपाय शोधण्यात येईल, असे व्हॉट्स ॲपकडून कोर्टाला सांगण्यात आले आहे.
व्हॉट्स ॲपकडून त्यांचे प्रतिनिधी पाठवले जाणार आहेत. व्हॉट्स ॲपचे प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीची भेट घेतील आणि सर्व गोष्टींबद्दल स्पष्टीकरण देतील.
व्हॉट्स अॅपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 22 मार्चला एका समितीची स्थापना केली. या समितीत केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि इंटरनेट क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे.