Mon. May 23rd, 2022

शौचलायात पोषण आहार बनवण्यात गैर काय?- आमदार इमरती देवी

देशातील सर्वात स्वच्छ शहर इंदौर हे ज्या राज्यात आहे, त्याच मध्य प्रदेशात काही दिवसांपूर्वी एका घटनेमुळे स्वच्छतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. आंगणवाडी केंद्रातील कर्मचारी मुलांसाठी चक्क शौचालयात पोषण आहार शिजवत होते. या घटनेमुळे नंतर चांगलाच गदारोळ उठला. मात्र मध्य प्रदेशमधील मंत्री इमरती देवी यांनी चक्क ‘शौचालयात स्वयंपाक करण्यात काय हरकत आहे?’ असा संतापजनक सवाल विचारलाय.

इमरती देवींचा दावा  

या घटनेचा इतका बाऊ करायची गरज नाही.

आंगणवाडीच्या कमोड आणि स्टोव्ह यांच्यात डिव्हायडर होता.

आपल्या घरातही डिव्हायडर घालून संडास बाथरूम  तयार केले जातात.

जर या कारणावरून नातेवाईकांनी आपल्या घरी जेवण्यास नकार दिला, तर काय कराल?
असा सवालही इमरती देवींनी केलाय.

 

कमोडवर ठेवली होती भांडी!

अंगणवाडी केंद्रात एका शौचालयात लहान मुलांसाठी अन्न शिजवण्यात येत असल्याची घटना समोर आली होती.

त्यासाठी लागणारी चक्क कमोडवर ठेवण्यात आली होती.

मुलांसाठी पोषक आहार अशा प्रकारे शौचालयात बनवण्यात येत असल्याचं पाहून अनेकांनी यावर आक्षेप नोंदवला होता. या घटनेची सध्या चौकशी सुरू असली, तरी इमरती देवी यांच्या विधानामुळे वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.