Mon. Aug 19th, 2019

Whatsapp चं नवं फिचर, तुमचं चॅटिंग राहणार सुरक्षित!

Whatsapp वापरणाऱ्यांसाठी एक नवं फिचर लाँच करण्यात आलं आहे. ज्यामुळे वापरणाऱ्यांच चॅटींग आणखी सुरक्षित राहणार आहे. ‘फिंगरप्रिंट लॉक’असं या फीचरचं नाव आहे.

0Shares

Whatsapp वापरणाऱ्यांसाठी एक नवं फिचर लाँच करण्यात आलं आहे. ज्यामुळे वापरणाऱ्यांच चॅटींग आणखी सुरक्षित राहणार आहे. ‘फिंगरप्रिंट लॉक’असं या फीचरचं नाव आहे. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या फिंगरप्रिंटशिवाय इतर कोणालाही व्हॉट्सअॅप उघडता येणार नाही.

Whatsapp चं नवं फिचर

Whatsapp ने अँड्रॉइड मोबाइलधारकांसाठी ‘फिंगरप्रिंट लॉक’नावाचं हे फीचर लाँच केलं आहे.  यामुळे Whatsapp वरचं तुमचं संभाषण सुरक्षीत झालं आहे. न लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये  हे फिचर मिळणार आहे. या फिचरबद्दलच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत अशी ही माहिती देण्यात आली आहे.

फिंगरप्रिंट लॉक’नावाच्या या फिचरमध्ये जो Whatsapp वापरतो त्याच्याव्यतीरिक्त कोणीही चॅंटिंग पाहू शकणार नाही.  वापरकर्त्यांच्या फिंगरप्रिंटशिवाय  Whatsapp वापरता येणार नाही. आठ महिन्यांपासून या फीचरसाठी  कंपनीकडून काम सुरू केले होते.

Whatsapp च्या सेटिंगमध्ये जाऊन अकाउंट मध्ये  प्रायव्हसी पर्यायावर क्लिक केल्यास तुम्हाला हे फीचर अॅक्टिव्ह करता येईल. Whats app चा डेटा जरी आपल्याला सुरक्षित आहे असं म्हणत असलो तरी मोबाईल दुसऱ्या कोणाच्या तरी हातात गेल्यावर हे मेसेज वाचले जातात. त्यामुळे या फिचरमुळे Whatsapp वरील मेसेज सेफ असणार आहेत.

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *