Jaimaharashtra news

Whatsapp ची ‘ही’ 3 नवी फिचर्स…

सर्वाधिक वापरलं जाणारं Whatsapp  हे लोकप्रिय app वेळोवेळी अपडेट होत असतं. आता Whatsapp मध्ये 3 नवी Features सुरू करण्यात आली आहेत. या Features मुळे Whatsapp च्या युजर्सना आणखी फायदा होणार आहे. काय आहेत ही Features, जाणून घ्या…

1. ग्रुप इन्व्हाईट फिचर

Whatsapp users ना सतावणारा एक त्रास म्हणजे त्यांना त्यांच्या परवानगीविना अनेकदा नको असलेल्या groups मध्ये add केलं जातं. अनेकदा विविध groups चा अतिरेक हा Whatsapp युजर्सना हैराण करत असतो. मात्र आता Group Invite Feature या नव्या feature मुळे आपली प्रायव्हसी अबाधित राखणं शक्य होणार आहे. आता या नव्या फिचरमुळे आपल्याला कोण ग्रुपमध्ये add करू शकतं, याचा निर्णय आपण घेऊ शकतो. Who can add me to groups? हे विचारण्यात येतं. यावर Everyone, my contacts तसंच My contacts except… असे दोन पर्याय आपल्यापुढे असतात. त्यानुसार आपण आपल्याला हवा असणारा पर्याय निवडून अनोळखी ग्रुप्सचा भडीमार रोखू शकतो.

2. कॉल वेटिंग फिचर

Whatsapp कॉल आणि फोन कॉल यांतील फरकावर हे फिचर आधारित आहे. Whatsapp ने Voice Over Internet Protocol service सुरू केल्यामुळे मोबाईल कॉल चालू असताना Whatsapp Call आल्यास ते वेटिंग कॉलही आता पाहू शकणार आहे. हे फिचर v2.19.352 तसंच त्यापुढील व्हर्जन्सवर मिळू शकतं. हे फिचर Video Calling साठीही वापरता येणार आहे.

3. Whatsapp रिमाईंडर फिचर

आता महत्त्वाच्या कामाची रिमाईंडर्स देण्याचं कामही Whatsapp करणार आहे. एखादं task आपण सेट केलं, तर त्या task ची आठवण करून देण्याचं काम Whatsapp करेल. मात्र त्यासाठी Any.do हे app डाऊनलोड करून घ्यावं लागेल. हे app मात्र Whatsapp प्रमाणे free नाही. त्यासाठी पैसे भरावे लागणार आहेत. विशेष म्हणजे हे रिमाइंडर आपण Whatsapp वर दुसऱ्यांना forward करू शकतो.

Exit mobile version