Fri. Jun 21st, 2019

नवीन नियम लागू झाल्यास भारतात व्हॉट्सअपला धक्का ?

82Shares

व्हॉट्सअपसाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

सध्या भारतात व्हॉट्सअपचे 20 कोटी यूजर्स आहेत.

परंतु भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सपला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

सरकारकडून कार्यरत करण्यात आलेल्या या नियमांमध्ये मेसेजेसचा नेमका स्ञोत शोधून काढण्यावर भर देणाऱ्या नियमाचा उल्लेख केला आहे.

तोच चिंतेचा विषय असल्याचं व्हॉट्सअप कम्युनिकेशनचे प्रमुख कार्ल वूग यांनी स्पष्ट केलं आहे.

व्हॉट्सअप मूलभूतरित्या एंड-टू-एंड एनक्रिप्शन करते.म्हणजे व्हॉट्सअप मधील मेसेजेस फक्त मेसेज पाठवणारा आणि प्राप्त करणारा हे दोघेच वाचू शकतात.

अगदी व्हॉट्सअपला पण हे मेसेजेस वाचता येत नाहीत.प्रस्तावित नियमांमुळे लोकांना हवी असणारी गोपनीयता व्हॉट्सअपला देता येणार नाही.

तसेच नवीन नियमानुसार उत्पादनाची पुर्नबांधणी करावी लागेल.यामुळे सध्याच्या रुपात असणारी संदेश सेवा जशी च्या तशी देता येणार नाही.असे ही वूम यांनी सांगीतल आहे.

या नियमांमुळे व्हॉट्सअप भारतीय बाजारातून बाहेर पडण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे.

 

82Shares

Leave a Reply

%d bloggers like this: