Thu. Jun 17th, 2021

व्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी घेतली मागे

व्हॉट्सॲपने आपल्या यूझर्सना खूशखबर दिली आहे. आपल्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी व्हॉट्सॲपने १५ मे ही अंतिम मुदत ठरवून दिली होती. मात्र चहुबाजूंनी टीका होऊ लागल्यानंतर व्हॉट्सॲपने आता माघार घेतली आहे. यूझर्सने नव्या पॉलिसीचा स्वीकार केला नाही, तरी त्यांचे अकाउंट सुरूच राहणार आहे.

काय आहे प्रायव्हसी पॉलिसी?

  • व्हॉट्सॲपचे यूझर्स जो कंटेंट व्हॉट्सॲपवर अपलोड करतात, सबमिट करतात, सेंड वा रिसीव्ह करतात, त्या सगळ्याचा वापर व्हॉट्सॲपची पॅरेंट कंपनी फेसबुक करू शकणार आहे.
  • यूजर आयडी, डिव्हाइस आयडी, शॉपिंग हिस्ट्री, फोन नंबर, ई-मेल पत्ता, पेमेंट इन्फो, प्रॉडक्ट इंटरॅक्शन, यूझर कंटेंट इत्यादी माहिती व्हॉट्सॲपकडे शेअर होणार आहे. त्यामुळे यूझर्सच्या प्रायव्हसीवर गदा येणार आहे.

या सर्व कारणांमुळे व्हॉट्सॲपच्या या प्रायव्हसी पॉलिसीला प्रखर विरोध होत आहे.

मग होणार काय?

  • व्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसीच्या अंतिम मुदतीपासून माघार घेतली असली तरी यूझरला पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठीचा मेसेज वारंवार येत राहील.
  • पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी यूझरला आग्रह धरला जाईल.
  • जे यूझर पॉलिसीचा स्वीकार करणार नाही, त्यांचे अकाउंट डिलीट होईल, असे आधी सांगितले गेले होते. परंतु तसे आता होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *