Sun. Aug 25th, 2019

करा ‘व्हॉट्सअॅप’ अपडेट आणि पाहा दिवाळी स्पेशल ‘स्टिकर्स’!

0Shares

एकेकाळी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छापत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर होई, मात्र नव्या जमान्यात यासाठीही ‘व्हॉट्सअॅप’चाच वापर होतोय. आपल्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना ‘व्हॉट्सअॅप’वरूनच दिवाळीच्या शुभेच्छा देण्याला प्राधान्य दिलं जातंय. जगातलं सर्वाधिक वापरलं जाणारं अॅप असणाऱ्या ‘व्हॉट्सअॅप’लाही याची कल्पना आहे. त्यामुळेच यंदा दिवाळीत ‘व्हॉट्सअॅप’नेच आपल्या युजर्सना खास गिफ्ट दिलं आहे.

‘व्हॉट्सअॅप’ने दिवाळीनिमित्त खास स्टिकर्स आणले आहेत. ही स्टिकर्स खास दिवाळीच्या शुभेच्छा देणारी आहेत. यात दिवाळीचे फटाके, आकाशकंदील तसंच शुभेच्छा यांचा समावेश आहे. मात्र यासाठी तुम्हाला तुमचं व्हॉट्सअॅप अपडेट करावं लागेल. 

321.png

 

566333.png56666.png24578.png

 

व्हॉट्सअॅपनेच असे खास स्टिकर्सचं दिवाळी गिफ्ट आपल्या युजर्सना दिल्यामुळे आता दिवाळीच्या शुभेच्छा देणं आणखी उत्साहवर्धक होणार आहे. 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *