Tue. Aug 20th, 2019

Whatsapp मुळे ‘रियुनियन’, प्रेमिकांचं पुनर्मिलन, पत्नीचं नाहक मरण!

0Shares

शाळेतील सवंगडी शालेय जीवन संपल्यावर वेगळे झाले. मात्र सुमारे 10 वर्षांनी Whatsapp ने त्यांना पुन्हा एककत्र आणलं. Whatsapp वर ग्रुप बनवून शाळेच्या त्या बॅचचे सगळे त्यावर एकत्र आले. गप्पा रंगू लागल्या. शाळेनंतर दूर झालेले प्रेमी पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडले. मग शाळा संपल्यावर तुटलेलं नातं पुन्हा बहरू लागलं. ते पुन्हा भेटू लागले, एकमेकांबरोबर वेळ घालवू लागले… पण ही गोड वाटणारी प्रेमकथा प्रत्यक्षात इतकी गोड नाही, तर ती आहे रक्ताने बरबटलेली…

Whatsapp वर भेटलं जुनं प्रेम, प्रेयसीच्या साथीने पत्नीचाच गेम’!  

धनबादला एकाच शाळेत शिकणारे राहुल आणि पद्मा केजीपासून एकत्र शिकत होते.

पुढे मोठे होत गेले, तसं त्यांच्यात प्रेम निर्माण झालं.

दहावीनंतर शालेय जीवन संपलं आणि पुढील शिक्षणासाठी आणि नोकरीच्या निमित्ताने दोघांना वेगवेगळ्या शहरांत जावं लागलं.

दोघांची love story अर्धवटच राहिली.

मात्र 2015 मध्ये त्यांच्या बॅचच्या सर्व शाळूसोबत्यांचा एक Whatsapp group तयार झाला आणि त्यानिमित्ताने दोघं पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले.

दोघांमध्ये पुन्हा गप्पा होऊ लागल्या.

त्यांच्यातील प्रेम नव्याने बहरू लागलं.

दोघं एकमेकांना भेटू लागले. एकमेकांबरोबर वेळ घालवू लागले.

मात्र या प्रेमामध्ये एक अडचण होती. त्याच्या किंवा तिच्या आई-वडिलांकडून नव्हे, तर त्याच्या पत्नीकडून…

राहुल पद्माचं प्रेमप्रकरण पुन्हा सुरू झालं होतं, तोपर्यंत राहुलचा विवाह झाला होता.

विवाहानंतर हे प्रकरण सुरू असल्याचा त्याच्या पत्नीला संशय येऊ लागला.

ती त्याला वारंवार प्रश्न विचारू लागली. त्यावरून दोघांमध्ये वाद होऊ लागले.

अखेर आपल्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा काटा काढायचं प्रेमिकांनी ठरवलं.

पद्माने तिला विष पाजून तिची हत्या केली. तिच्या नावाने आत्महत्येची खोटी चिठ्ठीही लिहिली.

मात्र पोलिसांना पोस्ट मॉर्टमनंतर संशय आला. राहुल आणि पद्माची सखोल चौकशी करण्यात आली. पोलिसांपुढे दोघांचीही हिंमत खचली आणि त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. प्रेमाच्या बंधनात आडकण्याची स्वप्नं पाहणाऱ्या दोघांना आता बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *