Wed. Jun 26th, 2019

‘WhatsApp Pay’ नवीन फीचर लवकरच

4Shares

WhatsApp आता मोबाइल युजर्सच्या  दैनंदिन जीवनाचा भाग बनलं आहे.  हेच WhatsApp आता आर्थिक व्यवहारांसाठीही वापरता येणार आहे. सध्या मेसेजिंगसाठी, Documents ट्रान्सफर करण्यासाठी, कॉण्टॅक्ट्स पाठवण्यासाठी अशा विविध गोष्टींसाठी WhatsApp चा वापर केला जातो. पण पुढच्या सहा महिन्यांत WhatsApp वर आर्थिक व्यवहार करणं शक्य होणार आहे. यामुळे ‘Google पे’ आणि Paytm या पेमेंट सुविधांप्रमाणेच WhatsApp Pay ही सुविधा सुरू होणार आहे. यासाठी काही मर्यादित युजर्ससोबत याची चाचणी केली जाणार आहे.

‘WhatsApp Pay’ कसे वापराल? 

बॅंकेमध्ये जाऊन आर्थिक व्यवहार पद्धतीवर नवनव्या ऑनलाईन व्यवहार पद्धतींमुळे सुलभता होत आहे.

यामध्ये भारतात आत्तापर्यंत पेटीएम, गुगल पे यासारखे ऑनलाईन पेमेंट ऑप्शन उपलब्ध आहेत.

आता यांच्या पाठोपाठ व्हॉट्सअ‍ॅप या शर्यतीत उतरले आहे.

पण याचा परिणाम आधीपासूनच्या पेटीएम, गुगल पे यांच्यावर होऊ शकतो.

NPCL अर्थात ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने WhatsApp ला पेमेंट सुविधा करण्यासाठी किमान व्यवहार करण्याची परवानगी दिली आहे.

येत्या पाच-सहा महिन्यांमध्ये याची पडताळणी करण्यासाठी दहा लाख युजर्सना आधी ही सुविधा पुरवली जाणार आहे.

या चाचणी यशस्वी झाल्यानंतर ही सुविधा सर्वांसाठी खुली असेल.

यासाठी Reserve Bank of India कडून डेटा लोकलायझेशन करण्यासाठी WhatsApp कडून नियम मान्य करण्यात आले आहेत.

4Shares

Leave a Reply

%d bloggers like this: