Thu. Apr 18th, 2019

खुशखबर! WhatsAppवर फोटो शेअर करणाऱ्यांसाठी आलं ‘हे’ नवं फीचर

43Shares

लोकप्रिय अॅप WhatsApp आपल्या युजर्ससाठी नेहमीच काही नवीन फीचर्स घेऊन येत असते. WaBetaInfo च्या माहितीनुसार WhatsApp आपल्या डुडल फीचरमध्ये बदल करत आहे.

लवकरच डुडल फीचरमध्ये इमोजी आणि स्ट्रिकरमध्ये ‘search’ बार जोडला जाणार आहे.

जेव्हा आपण कोणालाही फोटो पाठवताना त्यात डुडलचा वापर करतो. तेव्हा इमोजी आणि स्ट्रिकरची पूर्ण यादी समोर येते.

फोटोवर कोणतेही डुडल लावून पाठवायचा असेल तर त्या लिस्टमधून शोधावं लागतं.

पण आता अपडेटनंतर सर्चचा पर्याय मिळणार आहे. त्यात युजर्स स्ट्रिकर आणि इमोजी सर्च करू शकतील.

याआधी WaBetaInfo वर काही WhatsApp युजर्सनी बगची तक्रार केली होती. युजर्सनी सांगितलं प्रोफाइलवर नाव अपडेट करणं कठीण होऊन जातं.

जेव्हा आपण नाव लिहितो त्याच्या समोर कीबोर्ड येतो, जो आधी येत नव्हता.

पहिल्यांदा नाव टाइप केले की इमोजीचा पर्याय समोर यायचा, पण आता कीबोर्ड येतो. हे नवं फीचर तर नाही? असा प्रश्न युजरने विचारला होता.

व्हॉटसअॅप ग्रुप तयार करून एकाच वेळी अनेकांशी कनेक्ट होता येतं. मात्र काहीवेळा आपल्याला मित्र मंडळी न विचारता ग्रुपमध्ये अॅड करतात.

पण काहीवेळा तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड व्हायचे नसते. याचा विचार करून व्हॉटसअपने नवं फीचर आणलं आहे.

नव्या फीचरचे नाव ‘ग्रुप इन्व्हिटेशन’ असs असून तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड केल्यानंतर त्याचे नोटीफिकेशन येइल. जर त्याला तुम्ही परवानगी दिलीत तरच तुम्ही त्या ग्रुपमध्ये अॅड व्हाल.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *