Sat. May 25th, 2019

Whatsapp वेबवर ‘या’ फिचरचा समावेश

13Shares

Whatsapp वेबवर ‘पिक्चर-इन-पिक्चर’ (PIP) हे फिचर उपलब्ध झाले आहे. या फिचरच्या माध्यमातून यूजर्स Chat विंडोमध्ये Video प्ले करु शकतील. याचा अर्थ Whatsapp वर chat करताना chat विंडोमधून बाहेर न येता तुम्ही Video प्ले करुन पाहू शकता.

काय आहे PIP फिचर?

हे फिचर Whatsapp web version 0.3.2041 वर release करण्यात आलं आहे.

या आधी हे फिचर फक्त Whatsapp वर शेअर करण्यात येणाऱ्या videoसाठी काम करायचं.

मात्र आता Facebook, Instagram आणि Youtube  videoला सपोर्ट करणारा पर्याय दिला आहे.

या फिचरमुळे Whatsapp वर येणारा video वेगळ्या boxमध्ये open होणार आहे.

त्यामुळे video पाहण्यासोबतच तुम्ही chat ही करु शकता.

Group Calling साठी नवं feature!

Whatsapp नेहमीच युजर्ससाठी नवनवीन सेवा उपलब्ध होण्यासाठी नवीन फिचर्सवर काम करत असतं. त्याचप्रमाणे कंपनीने आयफोन अॅपमध्ये नवीन group calling बटण दिलं आहे.

लवकरच Android अॅपमध्येही असच बटण येण्याची शक्यता आहे.

आजपर्यंत Android यूजर्सना group audio किंवा video call साठी प्रथम समोरच्याला call करावा लागत असे.

त्यानंतर दुसऱ्याचा समावेश होतो.

मात्र नवीन बटण आल्यानंतर call सुरु होण्यापूर्वी group call मध्ये सहभागी होणाऱ्याचा समावेश करू शकतो.

हे ही वाचा – आता Facebookवरून WhatsApp, Instagramवरही मॅसेज पाठवता येणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *