Sat. Apr 17th, 2021

मुंबई व्हिलचेअर क्रिकेट संघाचा गणवेश उद्घाटन समारंभ पार पडला

भारतीय वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी यांच्या हस्ते मुंबई संघला गणवेश प्रदान करण्यात आले…

मुंबई : व्हिलचेअर क्रिकेट संघ गणवेश उद्घाटन समारंभ दि ११ डिसेंबर २०२० रोजी कोलगेट ग्राइंड खेरवाडी वांद्रे पूर्व येथे पार पडला. भारतीय वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी यांच्या हस्ते मुंबई संघला गणवेश प्रदान करण्यात आले.

आपल्या अपंगत्वावर मात करून क्रिकेट सारख्या खेळात प्राविण्य मिळवल्या सर्व खेळाडींचे धवल कुलकर्णी यांनी कौतुक केले. आणि त्याच्या बरोबर व्हिलचेअर क्रिकेटला सर्व घडकांकडून प्रोत्साहन मिळावे असे आव्हान तसेच आशा व्यक्त केली.

मुंबई क्रिकेट असोसिएसन अंडर १६ सिलेकटर निलेश भोसले, मुंबई रणजी टीमचे खेडाळू भावीण ठक्कर, संजीवनी क्रिकेट अकॅडमीचे लीलाधर सर , निर्मल नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद कांबळे, अर्बन बर्गरचे यश राणे आणि मुंबई व्हिलचेअर क्रिकेट संघाचे प्रशिक्षक संजय हडपी, यांनी उपस्थित राहून आपला पाठिंबा व्हिलचेअर क्रिकेट संघाला दर्शविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *