Fri. Sep 30th, 2022

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला खातेवाटप कधी ?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर मंगळवारी पार पडला. यामध्ये १८ जणांनी कॅबिनेट मंत्रिमदाची शपथ घेतली. पण आता या मंत्र्यांना कुठली खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आता मंत्रिमंडळ विस्तार झाला पण खातेवाटप कधी होणार याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

कॅबिनेटचा विस्तार मंगळवारी पार पडला आहे.  हे मंत्री पूर्ण क्षमतेनं काम सुरु करतील. तसेच लवकच ते आपापल्या खात्यांचा पदभार स्विकारतील. हे छोट मंत्रिमंडळ असून उर्वरित विस्तार अद्याप बाकी आहे,” असं मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या ९ तर भाजपच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. दरम्यान, महत्वाची खाती भाजपला देण्याची चर्चा आहे.

कुणाला कोणती मंत्रीपदे मिळण्याची शक्यता त्यावर एक नजर टाकूयात.

एकनाथ शिंदे – नगरविकास खाते
देवेंद्र फडणवीस – गृह आणि अर्थ
चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम
राधाकृष्ण विखे – पाटील महसूल, सहकार
उदय सामंत – उद्योग
तानाजी सावंत – उच्च व तंत्र शिक्षण
सुधीर मुनगंटीवार – उर्जा
रविंद्र चव्हाण – गृहनिर्माण
गिरीश महाजन – जलसंपदा
विजयकुमार गावित – आदिवासी विकास
अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक खाते
दीपक केसरकर – पर्यटन आणि पर्यावरण
मंगलप्रभात लोढा – विधी, न्याय
सुरेश खाडे – सामाजिक न्याय
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
अतुल सावे – आरोग्य

1 thought on “मंत्रिमंडळाचा विस्तार झाला खातेवाटप कधी ?

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.