Jaimaharashtra news

“सावरकरांचं स्मारक कुठे आहे?” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल 

 

 

लेखकांच्या जन्मगावी, वास्तव्याच्या ठिकाणी त्यांचे स्मारक नसल्याची खंत

 
नाशिक (दि. ०४/०९/२०२१): सावरकरांचे स्मारक कुठे आहे, असा प्रश्न जेष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी उपस्थित केला आहे. जनस्थान पुरस्कार-२०२१ जेष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी मधुभाईंनी आपले विचार व्यक्त केले.
 
 
“अनेक लेखक, कवी महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांच्या-त्यांच्या गावी, वास्तव्याच्या ठिकाणी स्मारक नाहीत”, अशी खंत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी जनस्थान पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केली. तसेच “अशी अनास्था अन्य राज्यात, अन्य भाषेत आढळत नाही”, असं देखील ते म्हणाले आहेत. यंदाचा जनस्थान पुरस्कार जेष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
Exit mobile version