Sun. Jan 16th, 2022

आर्थिक पाहणी अहवाल सादर, ‘यांनी’ बनवला नवा आर्थिक पाहणी अहवाल

निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिलाच आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला. हा अहवाल देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रोफेसर कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी बनवलेला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या अर्थसंकल्प सादर करतील. त्याआधी निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिलाच आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला. हा अहवाल देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रोफेसर कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी बनवलेला आहे. आर्थिक पाहणी अहवाल तयार करणारे हे कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांच्याविषयी लोकांना उत्सुकता आहे.

कोण आहेत कृष्णमूर्ती सुब्रमण्यन?

मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी 2018 मध्ये आपले पद सोडले आणि त्यांच्या जागेवर कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांची नियुक्ती करण्यात आली.

कृष्णमूर्ती सुब्रमण्य हे देशाचे सतरावे मुख्य अर्थिक सल्लागार आहेत. हे पद ते पुढील 3 वर्ष भुषविणार आहेत.

त्यांनी सादर केलेले हे त्यांचं पहिलंच आर्थिक सर्वेक्षण असल्याने त्यांच्याविषयीची उत्सुकता आहे.

ते हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिजनेसमध्ये ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. एनालिटिकल फायनान्स हा विषय ते शिकवत होते.

त्यांनी कानपूरमधून आयआयटी पदवी घेतली आहे. तर अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बिजनेसमधून एमबीए आणि पीएचडी केली आहे.

2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या नोटाबंदीचं त्यांनी समर्थन केल होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *