‘काँग्रेसचं सरकार अस्थिर करत होता, तेव्हा… राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्यासह शिंदे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या १९ आमदारांनीही राजीनामा दिला.
त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का लागला. दुसऱ्या बाजूला ज्योतिरादित्य शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला.
मध्य प्रदेशमधील या सर्व राजकीय नाट्यानंतर राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं.
राहुल गांधींनी मध्य प्रदेशमधील या नाट्यानंतर पहिलं ट्विट केलं आहे. या ट्विटमधून राहुल गांधींनी पतंप्रधान नरेंद्र मोदीवंर टीका केली आहे.
काय म्हणाले राहुल गांधी ?
राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
तुम्ही जेव्हा काँग्रेसचं निवडून आलेलं सरकार अस्थिर करण्यामध्ये व्यस्त होतात. तेव्हा कच्चा तेलाच्या दरात ३५ टक्के घसरण झाली. या घसरणीकडं तुमचं लक्ष गेलं नाही.
पेट्रोलचे दर प्रति लीटरपर्यंत ६० रुपयांपर्यंत आणून देशातील जनतेला फायदा देऊ शकता का? यामुळे अर्थव्यवस्थेला मजबूती मिळेल, असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे.