Fri. Jul 30th, 2021

दिशा रवी आहे तरी कोण?

पर्यावरण संवर्धनसाठी कर्य करणारी २१ वर्षीय दिशा रवीच्या अटकेनंतर अनेक नेत्यांनी दिशा रवीच्या अटकेला विरोध केला आहे. शिवाय ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरुन दिशाला शनिवारी बंगळुरु मधून अटक करण्यात आली असून दिशा रवी ‘टूलकिट गूगल डॉक्युमेंट’ची संपादक आहे.

‘टूलकिट गूगल डॉक्युमेंट’बनवण्यात व त्याचा प्रसार करण्याच्या कारस्थानात तिची मुख्य भूमिका आहे, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे टूलकिट बनवण्यात आली होती. ग्रेटा थनबर्गने सुद्धा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना हे टूलकिट शेअर केली होती.

या ‘टूलकिट’मधील माहिती ‘पोएटिक जस्टिस फाऊंडेशन’ या खलिस्तान समर्थक गटाशी संबंधित असल्याचं दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झालं होतं. दिशा रवीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दिशा रवीला झालेली अटक हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. शिवाय दिशाच्या अटकेनंतर सामाजिक क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दिशा रवीने बंगळुरुच्या खासगी कॉलेजमधून बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली आहे. शिवाय पर्यावरण कार्यकर्ती असणारी २१ वर्षीय दिशा रवी ‘फ्रायडेज फॉर फ्युचर इंडिया’ या ग्रुपची संस्थापक सदस्य आहे. वनस्पति आधारीत अन्न-पदार्थ बनवणाऱ्या कंपनी सोबत सुद्धा दिशा रवी काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *