Wed. Jun 19th, 2019

विखेंनंतर विरोधी पक्ष नेते कोण? काँग्रेसची बैठक

0Shares
कॉग्रेस विधीमंडळ पक्षाचे नवे नेते निवडण्यासाठी कॉग्रेस संसदीय पक्षाची बैठक झाली. विरोधी पक्ष नेत्याची निवडीसाठी आज कॉग्रेस संसदीय पक्षाची बैठक झाली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं आहे.  मात्र नेता निवडीचे सर्वाधिकार राहूल गांधी यांच्याकडे देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मात्र कॉग्रेसमध्ये तीन नेते या पदासाठी स्पर्धेत आहेत. यामध्ये वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरातांच्या नावाचा समावेश आहे. नेमके यातील कोण विरोधी पक्ष नेते पदावर असेल याबाबत राहुल गांधीच निर्णय घेणार आहे.

या नेत्यांच्या नावाची चर्चा

1.वर्षा गायकवाड

जेष्ठ कॉग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांच्या कन्या
धारावी मतदारसंघाच्या तिसऱ्यांदा आमदार
आघाडी सरकारमध्ये महिला, बाल कल्याण मंत्री

2. विजय वडेट्टीवार

चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रम्हपूरी मतदारसंघाचे आमदार
विधानसभेत कॉग्रेसचे उपनेते
शिवसेनेकडून झेडपी सदस्यापासून राजकारणाला सुरुवात
नारायण राणे यांच्यासोबत शिवसेना सोडून कॉग्रेसमध्ये दाखल
2008 ला राज्यमंत्री म्हणून सिंचन,आदिवासी विकास,वन खाती सांभाळली
आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडणारे नेते म्हणून प्रसिध्द

3. बाळासाहेब थोरात

कॉग्रेसचे जेष्ठ नेते, कृषी आणि  सहकार क्षेत्रातलं मोठ नाव
नगर जिल्ह्यातील विखे पाटलांनतरचा कॉग्रेसचा मोठा चेहरा
आघाडी सरकारच्या काळात महसूल मंत्री हे क्रमांक दोनचं पद भूषवलं
राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर विरोधक

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: