जागतिक आरोग्य संघटनेकडून धोक्याचा इशारा

देशात मागील एका वर्षापासून कोरोनाचं संकट कायम असून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक राज्यांमध्ये कडक टाळेबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.

कोरोना महामारीचं दुसरं वर्ष आणखी भयंकर असेल. पहिल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील. त्यामुळे हे वर्ष अधिक जीवघेणं असेल, असा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस अनाधोम यांनी दिला आहे. कोरोना महामारीचं स्वरुप अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे दुसऱ्या वर्षात कोरोनाचा विषाणू अधिक जीवघेणा होईल, असं टेड्रोस म्हणाले. श्रीमंत देशांनी आता सर्व लहानग्यांना लस टोचण्याऐवजी कोवॅक्सचे डोस दान करावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

 

Exit mobile version