Wed. Jun 29th, 2022

महाराष्ट्रात तलवारी कुणी मागवल्या?

छत्तीसगडकडून जालन्याकडे ८९ तलवारी घेऊन जात असताना धुळे पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे. तलवारींचा इतका मोठा साठा जप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, या तलवारी नेमक्या कोणाकडून घेण्यात आल्या? तसेच महाराष्ट्रात तलवारी कुणी मागवल्या? याचा शोध धुळे पोलीस घेत आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गावर सोनगीर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये ८९ तलवारींसह एक खंजीर जप्त करण्यात आला आहे. तसेच एक गाडीसुद्धा जप्त केली आहे. याप्रकरणी एकूण ७ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी जालना येथील मोहम्मद शरीफ मोहम्मद, शेख इलियास शेख लतीफ, सय्यद रहीम सय्यद रहीम आणि कपिल दाभाडे या चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जालन्याजवळ ८९ तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात तलवारी कुणी मागवल्या? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच महाराष्ट्रात दंगडी घडवण्याचा प्रयत्न होतोय का? असा सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.