Maharashtra

अग्निपथ प्रकरणी तरुणांची माथी कुणी भडकवली?’

शिवसेनेचा आज ५६ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. हा सोहळा पवई येथील वेस्टिन हॉटेलच्या सभागृहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. या वर्धापन दिनाच्या दिवशी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणूक आणि केंद्र सरकारने लष्करातील सैन्य भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेवर भाष्य केले आहे.

भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे ? असा सवाल त्यांनी केला आहे. अग्निपथ योजना म्हणजे मृगजळ आहे. नोकरी चालकाचे नाव पण अग्नीवर, असे म्हणत आता भाडोत्री राजकारण्यांसाठी टेंडर काढा, असा खोचक सल्ला मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिला आहे. अग्निपथ योजनेवरून कुणी तरुणांची माथी भडकावली ? तरुणांवर हि वेळ का आणि कोणामुळे आली ? उद्या तरुण अंगावर आले, तर झेलणार कोण ? असा सवाल मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला केला आहे.

पुढे मुखमंत्री म्हणाले महाराष्ट्राला सत्तेचा माज चालत नाहि हे उद्याच्या निवडणुकीत दाखवून देऊ. यापुढे कणखरपणे विरोधकाला उत्तर दिले जाईल. ५६ वर्षात शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी केला आहे. त्यामुळे शिवसेना मजबूतपणे उभी राहिली आहे. पक्षासाठी अंगावर वर झेलणाऱ्यांचे अभिवादन करून शिवसैनिकांच्या संघर्षामुळेच उभी राहिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. स्वप्न साकारण्यासाठी झटणे म्हणजे शिवसैनिक असे सांगून त्यांनी यावेळी पहिल्या फळीतील दिवाकर रावते आणि सुभासग देसाई यांचा आवर्जून उल्लेख केला आहे.

manish tare

Recent Posts

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

सोलापूर येथील केकडे नगरातील दशरथ नागनाथ नारायणकर या तरूणाचा गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाला. प्रियकराच्या…

2 weeks ago

गॅस वाहतूक करणारा टॅंकर नदीत कोसळला

 मुंबई-गोवा महामार्गावर गुरूवारी दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. एक गॅस कंटनेर थेट पुलावरुन…

2 weeks ago

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत श्रीकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या…

2 weeks ago

शिवसेनेचा ‘प्लॅन बी’ तयार

शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेनं शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही…

2 weeks ago

‘शाहांचा दौरा ठाकरेंना झोंबला’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गोरेगावच्या नेस्को संकुलात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपावर टीका केली.…

2 weeks ago

‘ज्यांना जायचे आहे त्यांनी निघून जा’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.…

2 weeks ago