Sat. Jul 11th, 2020

भेंडवळच्या घटमांडणीत नरेंद्र मोदींसंदर्भात काय वर्तवलं भाकीत ?

350 वर्षांपेक्षा अधिकची परंपरा असलेल्या भेंडवळ घटमांडणीच्या भाकिताकडे अजूनही सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. यंदाचं भाकीत आज सकाळी वर्तवण्यात आलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी हे भाकीत वर्तवण्यात आल्याने याबद्दल सर्वांना उत्सुकता होती. यंदाच्या भाकीतामध्ये ‘राजा कायम राहील’ असं भाकीत वर्तवण्यात आलंय.

दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावर घटमांडणी केली जाते. 7 मे 2019 रोजी म्हणजेच मंगळवारी ही घटमांडणी करण्यात आली आणि 8 मे 2019 म्हणजेच आज पहाटे या घटमांडणीच्या आधारे भविष्य वर्तवण्यात आलं. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी हे भविष्य वर्तवलं.

राज्यातील अनेक लोकांचा आणि खासकरून शेतकऱ्यांचा भेंडवळीच्या घटमांडणीवर विश्वास आहे.

या घटमांडणीद्वारे पीक,पाणी,राजकारण, देशाची सुरक्षा या मुद्दाबाबत भाकीत वर्तवलं जातं.

घटमांडणीमध्ये विडा आणि सुपारी याकडे सगळ्यांचं विशेषार्थाने लक्ष असतं.

या दोन्हीच्या आधारे सत्तेबाबतची भाकीतं केली जातात.

काय होता यंदाच्या घटमांडणीचा अर्थ?

यंदाच्या घटमांडणीमध्ये विडा आणि त्यावर ठेवण्यात येणारं नाणं हे देखील तसंच होतं.

सुपारी मात्र किंचित हलली होती.

याचा अर्थ थोडीफार राजकीय संकटे येतील मात्र राजा कायम असेल असा काढला जातोय.

पीक पाण्याबाबतही भेंडवळीच्या घटमांडणीत भाकीते वर्तवण्यात आली.

जून महिना हा सर्वसाधारण पावसाचा असेल.

म्हणजेच काही भागात चांगला पाऊस पडेल तर काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

जुलै महिन्यात मात्र चांगला पाऊस होईल असंही भाकीत वर्तवण्यात आलं आहे. ऑगस्ट महिन्याबाबत

भाकीत वर्तवताना हा महिना कमी पावसाचा असेल असे सांगण्यात आलंय.

मात्र जून महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर महिन्यातील पाऊस मात्र लहरी स्वरुपाचा असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

नैसर्गिक संकटांबद्दल भाकीत वर्तवत असताना अवकाळी पाऊस, चारा-पाण्याची टंचाई, भूकंपाचे हादरे बसणे आणि किनारपट्टीवर काही संकटे निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काय असते भेंडवळीतील घटमांडणी?

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या शेजारी भेंडवळ या गावात ही घटमांडणी करण्यात येते.

बस स्टँड शेजारी असलेल्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते.

या घटांमध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी,  वाटाणा, मसूर, करडी अशी 18 प्रकारची धान्यं ठेवण्यात येतात.

घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळं ठेऊन त्यावर पाण्याने भरलेली घागर, पानसुपारी, पुरी- पापड, खांडोळी, करडई हे खाद्यपदार्थ ठेवले जातात.

ही घट मांडणी झाल्यानंतर शेतामध्ये रात्रभर कोणीही थांबत नाही.

दुसऱ्या दिवशी पहाटे या घटांमध्ये झालेल्या नैसर्गिक बदलांवरून भाकीत वर्तवण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *