Mon. Jan 24th, 2022

निवडक नेत्यांसह सारथीची बैठक का?; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा सवाल

सारथी संस्थेच्या बैठकीतून अनेक मराठा समन्वयकांना दूर करून ‘मविआ’च्या काही निवडक नेत्यांसोबतच सारथीची बैठक पार पडली. त्यामुळे मराठा समन्वयकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून निवडक नेत्यांसहच सारथीची बैठक का घेण्यात आली? असा सवाल मराठा क्रांती ठोक मार्चाने उपस्थित केला आहे.

पुण्यात शनिवारी सारथी संस्थेची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकित अनेक मराठा समन्वयकांना दूर ठेवण्यात आले. त्यामुळे मराठा समन्वयकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी बैठकीपासून दूर राहणे पसंत केले. सारथी संस्थेबाबत पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक होत असताना या बैठकीतून निवडक मराठा समन्वयकांना का वगळले? तसेच महाविकासआघाडीमधील निवडक नेत्यांसोबतच सारथीची बैठक घेणार का?, असा सवाल मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *