Wed. Dec 11th, 2019

का साजरा केला जातो बकरी ईद ? जाणून घ्या !

देशभरात बकरी ईद साजरी होत असून मुस्लिम बांधवांसाठी हा मोठा उत्साहाचा दिवस आहे. बकरी ईदला ईद- अल – अदा असंही म्हटलं जातं. यंदा बकरी ईद 11 ऑगस्टपासून 12 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत साजरा केला जाणार आहे. मुस्लिम बांधवांसाठी हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. यादिवशी मेंढी किंवा बकरीचे बलिदान दिले जाते. यादिवशी नातेवाईकांना भेटवस्तू, मिठाई देतात. या दिवशी आपल्याला असलेली प्रिय वस्तू बलिदान म्हणून दिली जाते.

का साजरी केला जातो बकरी ईदचा सण ?

अल्लाहने इब्राहिम यांना सर्वात प्रिय असलेली वस्तू कुर्बान करण्यास सांगितली होती.

इब्राहिमचा एकुलता एक मुलगा कुर्बान करण्यास तयार झाले.

कुर्बानी देताना त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली होती.

कुर्बानी दिल्यावर पट्टी काढल्यानंतर मुलाच्या जागी बकरी असल्याने तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे.

कुर्बानी देताना काय आहेत नियम ?

ज्या प्राण्याची कुर्बानी दिली जाणार आहे, तो नर किंवा मादी असू शकतो.

प्राण्याचे आरोग्य स्वस्थ असणे महत्त्वाचे असून अपंगत्वापासून मुक्त असला पाहिजे.

बकरी किंवा मेंढी 1 वर्षाची असली पाहिजे तर गाई-गुरं 2 वर्षाचे असावे तर उंट पाच वर्षांचा असणे गरजेचे आहे.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *