Wed. Jan 19th, 2022

चित्रकार, शिल्पकारांकडे मुख्यमंत्र्यांचा कल का नाही वळला?

  कोरोना काळात गेले दीड वर्षात कोरोनाचा हाहाकर असल्यामुळे चित्रकार आणि शिल्पकार यांनी आपल्या कलाकृतीचे प्रदर्शन मांडले नाही. या प्रदर्शनांवरच या कलाकारांचा उदरनिर्वाह होत असतो. त्यामुळे ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: छायाचित्रकार असतानाही राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांवर त्यांचा ‘फोकस’ का नाही वळला,’ असा सवाल अँड आशिष शेलार यांनी राज्यसरकारला केला आहे.

  ‘राज्यातील १० हजार चित्रकार, शिल्पकार दरवर्षी प्रदर्शन करत असतात. आणि त्यावरच चित्रकारांचा उदरनिर्वाह होत असतो. परंतु कोरोना काळात गेल्या दीड वर्षांत प्रदर्शने होऊ शकली नाहीत. आपल्या राज्याला, देशाला कलेच्या माध्यमातून समृद्ध करणाऱ्या या कलावंताचा अशावेळी राज्य सरकारने संवेदनशीलपणे विचार करण्याची गरज होती’ असे आशिष शेलार म्हणाले.

  कर्नाटक, चंदिगड राज्यांनी आपआपल्या राज्यातील कलावंतांना मदत केली. महाराष्ट्रात तर स्वत: मुख्यमंत्री छायाचित्रकार आहेत पण या उपेक्षित घटकाकडे त्यांचा फोकस वळला नाही याची आठवण करून देण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली असल्याची त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील कलावंतांना मदत करण्याची मागणी आशिष शेलार यांनी राज्यसरकारकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *