Sun. Aug 25th, 2019

बीग बींचा ‘सुर्यवंशम’ हा सिनेमा वारंवार का दाखवला जातो?

0Shares

 

‘सुर्यवंशम’ आणि टीव्ही यांचं नातं काही अतूटच आहे. ‘सेट मॅक्स’ चॅनेलने बनवून ठेवलेला अजेंडा हा न मोडीत काढणारा झाला आहे. कारण इतर कोणत्याही चॅनेलला महत्वाचा क्रिकेटचा सामना असो किंवा एखादी मोठी बातमी असो, ‘सुर्यवंशम’ हा सिनेमा मात्र आठवड्यातून तीनदा  ‘सेट मॅक्स’ चॅनेलवरती झळकतोच. यामुळेच ‘सुर्यवंशम’ चित्रपटाविषयी सोशल मीडियावर अनेक विनोद फिरताना दिसतात,बॉलीवूडचे महानायक ‘अमिताभ बच्चन’ यांना सुद्धा अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्याचा प्रयत्न चाहत्यांकडून होत असतो.

या कारणांमुळे ‘सुर्यवंशम’ वारंवार झळकतो टीव्हीवर –

‘सुर्यवंशम’ हा सिनेमा 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता याच वर्षी सोनी टिव्हीच्या ‘सेट मॅक्स’ या चॅनेलची सुरवात झाली होती. या दोन्ही गोष्टी सोबतच्या असल्यामुळे या चॅनेलच्या अधिकाऱ्यांचे चित्रपटाशी भावनिक नाते जोडले गेलेले आहे. यामुळे ‘सुर्यवंशम’ हा सिनेमा ‘सेट मॅक्स’वर वारंवार दाखवला जातो.

एखाद्या चॅनेलला एखादा चित्रपट टिव्हीवरती दाखवायला विशिष्ट कालावधीपर्यंत सिनेमाचे हक्क विकत घ्यावे लागतात. ‘सेट मॅक्स’ने सुर्यवंशम चित्रपटाचे मालकी हक्क तब्बल 100 वर्षांसाठी विकत घेतलेले आहेत, त्यामुळे ‘सेट मॅक्स’ कितीही वेळा हा सिनेमा दाखवू शकते.

‘सुर्यवंशम’ हा मुळात 1997 मध्ये तमिळ आणि 1998 मध्ये तेलगूमध्ये प्रदर्शित झाला होता त्यानंतर इ व्ही व्ही सत्यनारायणा यांनी अमिताभ बच्चन यांना घेऊन ‘सुर्यवंशम’ हिंदीमध्ये केला त्यामुळे या सिनेमाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. अजुनही लोक हा चित्रपट आवडीने बघतात.

‘सुर्यवंशम’ सिनेमाबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी –
अमिताभ बच्चन यांनी हिंदीमध्ये हा चित्रपट करूनसुद्धा 2000 साली कन्नड भाषेमध्ये चित्रपटाचा रिमेक आला होता.
तीनदा रिमेक होऊन सुद्धा तीनही भाषांमध्ये चित्रपटाचे नाव ‘सुर्यवंशम’ हेच होते.

पण बऱ्याच लोकांना हे माहित नाही, की या सिनेमामध्ये अमिताभ बच्चनसोबत काम करणाऱ्या हिरोईनला बॉलीवुड अभिनेत्री रेखा यांनी आवाज दिला.

त्यावेळी अमिताभ बच्चन यांच्या ‘सुर्यवंशम’ सिनेमाचे बजेट 7 करोड इतके होते आणि सिनेमाने त्याकाळी 12.65 करोड इतकी कमाई केली होती.

‘सुर्यवंशम’ चित्रपटाची नायिका सौंदर्या रघु यांचे 2004 मध्ये एका विमान अपघातात निधन झाले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *