निवडणूक नसताना कशाला भिजत भाषण करायचं? – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात जाहीर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी मविआवर निशाणा साधला. तर, भाषणाच्या सुरूवातीलाच राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला. तसेच पुण्यात बंदिस्त सभागृहात सभा का घेतली, यामागचे कारणही राज ठाकरेंनी सांगितले आहे.
भाषणाच्या सुरूवातीलाच राज ठाकरेंनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. निवडणूक नसताना कशाला भिजत भाषण करायचं? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. राज्यात सध्या पावसाचे वातावरण आहे. मुंबईत कालच पाऊस पडला. पुण्यातही पाऊस पडण्याची चिन्हे असू शकतात. त्यामुळे निवडणुका नाहीत, काही नाही, तर उगीच कशाला पावसात भिजत भाषण द्या. म्हणून, पुण्यातील सभा मोकळ्या जागेत न घेता बंदिस्त सभागृहात घेतली.
‘पवारांना औरंगजेब सुफीसंत वाटतो’
तसेच, पवारांसोबत राहून शिवसेना बाळासाहेबांची अप्रतिष्ठा करत असल्याचा घणाघातही राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केला आहे. तर ओवैसी औरंगजेबाच्या कबरीवर गेल्याप्रकरणी राज्यात नवा वाद निर्माण झाला. ओवैसीने औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. मात्र, याप्रकरणी राज्यात कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. असे म्हणत, पवारांना औरंगजेब सुफीसंत वाटतो, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. तसेच पवारांनी अफझलखानाचे उदात्तीकरण केले असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे.