Mon. Jul 22nd, 2019

जपमाळेतील 108 मण्यांचा ‘असा’ असतो सूर्याशी संबंध!

0Shares

देवाचं नामस्मरण आणि जप करण्यासाठी आता मोबाईल apps  आली आहेत. Counters वरही जप केला जातो. मात्र जपमाळेचाच वापर जपासाठी जास्त प्रभावी मानला जातो. जपाचं सामर्थ्य जपमण्यांमध्ये झिरपत असल्याचं म्हटलं जातं. साधारणतः जपमाळ ही रुद्राक्षांची, मण्यांची किंवा स्फटिकाची असते. माळ वेगवेगळ्या प्रकारची असली, तर जपमाळेत मणी मात्र कायम 108 च असतात, हे तुम्ही पाहिलंय का? जपमाळेत 108 मणी असण्याचं नेमकं कारण काय?

म्हणून असतात जपमाळेत 108 मणी!

जपमाळेतील 108 मण्यांमागे खगोलीय गणित आहे.

त्याचा संबंध अंतरिक्षाशी असतो.

एका वर्षात सूर्य 2,16,000 वेळा कला बदलतो.

8 महिने तो उत्तरायणात अशतो, तर 6 महिने दक्षिणायनात.

म्हणजेच एका अयनात 6 महिन्यांच्या कालखंडात तो 1,08,000 वेळा कला बदलत असतो.

यातील शेवटचे तीन 0 हटवून माळेत 108 मणी ठेवले जातात.

हे मणी सूर्याच्या कलांचे प्रतिक मानले जातात.

त्यामुळे 108 हा अकडा धर्मशास्त्रांत पवित्र मानला जातो. 108 वेळा जप करण्याची शास्त्रांत प्रथा आहे. देवाचं 108 वेळा नामस्मरण केल्याने पुण्य लाभतं, असं म्हणतात.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: