Mon. Jan 17th, 2022

ऋषि कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर रणबीर आणि रिद्धिमासोबत का राहत नाही? या गोष्टी केला खुलास

लॉकडाउनच्या काळात अभिनेत्री नीतू कपूर या मुलीसोबत म्हणजेच रिद्धिमा कपूरबरोबर वेळ घालवलत होत्या. दोघी मायलेकी सोशल मीडियावर फोटो सुद्धा शेअर करत होत्या. आता रिद्धिमा पुन्हा सासरी दिल्लीला परत गेली आहे. आता अनेकांना विचार येत असणार की नीतू कपूर या रणबीर कपूर सोबत का नाही राहत? नीतू कपूर यांनी नुकतीच फिल्म फेअरला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी एकटं राहण्यामागचे कारण सांगितले आहे. ‘माझी इच्छा आहे की माझ्या मुलांनी त्यांच्या आयुष्यात व्यग्र रहावे. मी त्यांना सांगत असते माझ्या हृदयात रहा पण माझ्या डोक्यावर चढू नका.

लॉकडाउनच्या काळात जेव्हा रिद्धिमा माझ्यासोबत राहत होती तेव्हा मला काळजी वाटायची. मी तिला सारखं बोलायची की तू परत दिल्लीला जा. तुझा पती भरत तुझी वाट पाहात असेल. मी तिला सारखं जायला सांगत होते. मला एकटं राहायला आवडतं’ असे नीतू कपूर म्हणाल्या. पुढे नीतू कपूर म्हणाल्या, ‘मला अजूनपण लक्षात आहे जेव्हा रिद्धिमा शिक्षणासाठी लंडनला गेली होती तेव्हा मी खूप रडले होते. रिद्धिमाचे कोणी मित्रमैत्रिणी घरी आले तरी मला रडू कोसळायचं. पण नंतर जेव्हा रणबीर शिक्षणासाठी बाहेर गेला तेव्हा मला रडू आले नाही. त्यावेळी मला मुलांपासून लांब राहण्याची सवय झाली होती. तसेच त्यांचे देखील आयुष्य आहे. ते जेव्हा मला भेटायला येतात तेव्हा मला आनंद होतो. पण त्यांनी पुन्हा आपापल्या घरी जाऊन आनंदाने आयुष्य जगावे असे मला वाटते. मी त्यांना नेहमी सांगते मला दररोज भेटू नका.’ असं त्यांनी यावेळी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *