Wed. Aug 10th, 2022

#AprilfoolDay : म्हणून सुरू झाला April Fool Day

एखाद्याची खिल्ली उडवल्यावर, एखाद्या व्यक्तीला मुर्ख बनवल्यावर त्या व्यक्तीला सहसा वाईट वाटू शकतं किंवा ती व्यक्ती दुखावली जाऊ शकते. पण हाच तो दिवस ज्या दिवशी कोणीही कुणालाही मजेशीर पद्धतीने ‘एप्रिल फूल’ बनवू शकतो. एखाद्याला फूल बनवण्याचा आजचा अधिकृत दिवस आहे असं म्हणायला  हरकत नाही. बुरा ना मानो 1st April है! पण हा दिवस साजरा करताना, खिल्ली उडवताना कुणाच्या जीवावर बेतणार नाही ना याची काळजी देखील काळजी घेतली पाहीजे.

एप्रिल फूल दिवसाला कशी सुरूवात झाली?

एप्रिल फूल दिवस साजरा करण्यामागेही एक मजेशीर गोष्ट आहे.

पोप तेरावे ग्रेगरी म्हणजेचं  १५ व्या शतकातले पोप यांचा  एक मजेशीर किस्सा यावेळा सांगितला जातो.

पोपने नव्या वर्षाची सुरुवात १ एप्रिल ऐवजी १ जानेवारीपासून करायला सुरूवात केली.

त्यांनी ज्युलिअन दिनदर्शिका बदलून ग्रेगरिअन दिनदर्शिका वापरात आणली.

आणि त्या शतकातील लोकांना नव्या दिनदर्शिकेसोबत जुळवून घेणं काही केल्या जमत नव्हतं.

त्याला विरोध करत काहींनी मुद्दाम जुन्या १ एप्रिलच्याच दिनदर्शिकेचा अट्टाहास चालू ठेवला.

त्यांनी १ एप्रिललाच नव्या वर्षाची मान्यता दिली.मात्र त्यांच्या या अट्ट्हासाला सगळ्यांनी त्यांचा मुर्खपणा मानला.

तेव्हापासून हा दिवस ‘मुर्खांचा दिवस’ साजरा केला जाऊ लागला.असं म्हणतात.

फ्रान्समधील या घटनेचा युरोमध्ये प्रसार झाला आणि एप्रिल फूल या दिवसाचा उदय झाला, असे सांगितले जाते.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.