Sun. Aug 25th, 2019

मराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती

0Shares

मराठा आंदोलक गेल्या चौदा दिवसांपासून आझाद मैदानात आरक्षणासाठी बेमुदत आमरण उपोषण करत आहेत. आंदोलकांची प्रकृतीही आता बिघडली आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र आंदोलनाऐवजी जल्लोषाची तयारी करा, असं सूचक विधान करून मराठा आरक्षणाला हिरवा कंदील असल्याचं दाखवलंय. पण महाराष्ट्रात पेटलेल्या मराठा आंदोलनाचं कारण काय आहे? मराठा आंदोलकांच्या काय मागण्या आहेत? या आरक्षणाला कोणाकोणाचा पाठिंबा आहे?  मराठा समाजाला कोणतं आरक्षण हवं? जाणून घ्या याबाबत अधिक…

काय आहेत मागण्या?

 • मराठा समाजाच्या वतीने शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 16 टक्के आरक्षणाची मागणी
 • मागासवर्गीयांचा (OBC) कोटा वाढवून त्यात मराठा जातीचा समावेश करण्याची मागणी
 • तर त्यानंतर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी झाली.
 • आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
 • अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात विषय मांडण्यात यावा
 • पुढे बोलताना मराठा आंदोलकांनी दिशाभूल होऊ नका, हिंसाचार करु नका असं आवाहन केलं आहे.
 • मराठा आरक्षणाला कुणाचा पाठिंबा?
 • मराठा समाज –  98.30 टक्के
 • कुणबी –  89.56 टक्के
 • ओबीसी –  90.83
 •  इतर जातीय –  89.39 टक्के

मराठा समाजाला कोणतं आरक्षण हवं?

 • 20.94 टक्के लोकांना नोकरीत आरक्षण हवं
 • 12 टक्के लोकांना शिक्षणात आरक्षण हवं
 • 61. 78 टक्के लोकांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण हवं
 • मराठा आरक्षण अहवालातील निरीक्षण –
 • 10 वर्षात मराठा समाजातील अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या
 • सर्वे केलेल्या 43 हजार 629 कुटुंबांमधील 345 जणांच्या आत्महत्या
 • आत्महत्या केलेल्या 345 पैकी 277 शेतकरी मराठा समाजातील
 • मराठा समाजाच्या वास्तव्याचा अभ्यास –
 • शहरी भाग – 74.4 टक्के लोक
 • ग्रामीण भाग –  68.2 टक्के लोक
 • नोकरीच्या, कामधंद्याच्या निमित्ताने अनेकांचं शहरांकडे स्थलांतर
 • अनेकांना शहरात माथाडी, हमाल, डबेवाला अशी कामं करावी लागली

33 हजार 451 कुटुंबांचं सर्वेक्षण 

 • 21.68 टक्के मराठा लोकांचं वार्षिक उत्पन्न 2 लाख 40 हजार
 • 51.14 टक्के मराठा लोकांचं उत्पन्न 2 लाख 40 हजार ते 5 लाखांपर्यंत
 • 18.65 टक्के लोकांचं उत्पन्न 50 हजार ते 1 लाख
 • टीव्ही, फ्रिज वॉशिंग मशीन, एसी, लॅपटॉप यापैकी एकही सुविधा न वापरणाऱ्या मराठ्यांची संख्या 25 टक्के आहे
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *