वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

World Cup मधील आपल्या पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजने धमाकेदार कामगिरी करत पाकिस्तावर 7 गडी राखून मात केली आहे. West Indies ने 14 overs मध्येच पाकिस्तानचं 106 धावांचं आव्हान पूर्ण केलं.

कसा रंगला सामना?

West Indies चा सलामीवीर ख्रिस गेल या पाकिस्तानी बॉलर्सचा धुव्वा उडवला.

6 चौकार आणि 3 षटकार मारत अवघ्या 34 बॉल्समध्ये त्याने 50 धावा पूर्ण केल्या.

पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरने 3 विकेट्स मिळवल्या. मात्र पाकिस्तानला विजय मिळवून देण्यात तो कमी पडला.

पाकिस्तानची दुर्दशा

पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात दारूण पराभव स्वीकारावा लागलाय.

अवघ्या 105 धावांमध्ये संपूर्ण पाकिस्तान संघ तंबूत परतला माघारी परतला.

वेस्ट इंडिजचा कॅप्टन जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला.

उसळत्या बॉलच्या जोरावर वेस्ट इंडिजच्या बॉलर्सनी पाक बॅट्समनची पळताभूई थोडी केली.

पाकिस्तानची टीम 100 धावांचा टप्पाही ओलांडण्याची शक्यता धूसर झाली होती. पण वहाब रियाझच्या बॅटिंगमुळे पाकिस्तान निदान 105 धावा तरी करू शकला.

Exit mobile version