Wed. Oct 5th, 2022

शहीद जवान पतीला पत्नीची ‘अनोखी’ श्रद्धांजली

मेजर प्रसाद गणेश यांचा २०१७ रोजी भारत- चीन सीमारेषेवर लागलेल्या आगीत मृत्यू झाला होता.मेजर प्रसाद गणेश यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी गौरी प्रसाद महाडिक यांनी आपली नोकरी सोडून लष्करात भरती होण्याचा धाडसी निर्णय घेतला. मी सैन्यात भरती होऊन  माझ्या पतीला श्रद्धांजली अर्पण करत असल्याचे गौरी महाडिक यांनी म्हटलं आहे. गौरी यांमी सैन्यातील लेफ्टनंट पदासाठीच्या दोन परिक्षा दिल्या आहे. विशेष म्हणजे गौरी या परिक्षेत पासही झाल्या आहेत. सध्या गौरी महाडिक चैन्नईत ऑफिसर पदाची ट्रेनिंग घेत आहेत. गौरी महाडिक अधिकारी प्रशिक्षण केंद्रात रुजू होण्यास सज्ज झाल्या आहेत.

स्वप्न होणार साकार

सर्व्हीस सिलेक्शन बोर्डकडून घेण्यात आलेल्या परिक्षेत गौरी यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

त्यासाठी 16 जणांनी परिक्षा दिली होती.

त्यामध्ये टॉप करून सैन्यात भरती होण्याच्या दिशेने गौरींनी पाऊल टाकले.

एप्रिल महिन्यात त्यांच्या प्रशिक्षण कालावधीला सुरूवात होणार असून मार्च 2020 मध्ये गौरींचे प्रशिक्षण पूर्ण होणार.

सैन्यातील शहीद जवानींच्या पत्नीसाठी एसएसबी बोर्डाकडून ही परिक्षा घेतली जाते.

त्यासाठी 16 परिक्षार्थींची निवड झाली असून बंगळूर, भोपाळ आणि अलाहाबाद येथे या परिक्षा घेण्यात येतील.

भोपाळमधील परिक्षेमध्ये गौरीला चेस्ट नंबर (28) मिळाला होता,तोच त्यांच्या पतींनाही मिळाला होता, असे त्यांनी सांगितले आहे.

त्यामुळे हा गौरी यांच्या आयुष्यातील खूप मोठा योगायोग आहे, असे गौरींनी सांगितले.

मुलींसाठी प्रेरणा

गौरी या एलएलबी पदवीधर आहेत.

2015 मध्ये त्यांचे प्रसाद महाडिक यांच्याशी लग्न झाले.

त्यानंतर त्या वकिली करत होत्या.

मात्र 2017 मध्ये पतीच्या निधनानंतर गौरींनी आपला वकिली व्यवसाय बंद केला आणि भारतीय सैन्य भरतीच्या परिक्षेची तयारी सुरू केली.

त्यामुळे लवकरच त्यांचे स्वप्न साकार होत असून त्या ‘लेफ्टनंट’ गौरी प्रसाद महाडिक होतील.

आपल्या शहीद पतीला हीच  श्रद्धांजली असेल, असेही गौरी अभिमानाने म्हणाल्या.

मातृभूमीसाठी शहीद झालेल्या जवानाच्या पत्नीचे हे विचार कोट्यवधी मुलींना प्रेरणा देणारे आहेत.

तसेच वीरमाता आणि वीरपत्नीचे धैर्य वाढवणारे आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.