Jaimaharashtra news

पोलिसांनी लावून दिलं पोलीस स्टेशनमध्ये महिलेचं दीराशी लग्न!

पोलीस हे केवळ गुन्हेगारांना पकडूनच जनतेच्या समस्या सोडवतात, असं नव्हे, तर कधीकधी वर्दीतला माणूस अनेकदा त्यांच्यासमोर समस्या घेऊन आलेल्या लोकांची माणुसकीच्या नात्यानेही मदत करतो. उत्तर प्रदेश येथील कौशांबीमध्येही अशीच एक घटना घडली. पोलिसांनी एका विधवा महिलेचा विवाह तिच्या दीराशी लावून दिला.

काय घडलं होतं नेमकं?

सुनिता आणि राजेश यांचं 4 वर्षांपूर्वी विवाह झाला होता.

मात्र 2 वर्षांपूर्वी राजेशचं निधन झालं.

त्यानंतर सुनिताचा सासरच्या मंडळींकडून जाच होत होता.

यासंदर्भात सुनिताची आई पार्वती देवी यांनी पोलिसांत तक्रार केली होती.

सुनिताही 4 महिन्यांपूर्वी सासरच्यांनी परत पाठवल्यामुळे माहेरी येऊन राहू लागली होती.

पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिलं. सुनिता, तिचे पालक आणि तिच्या सासरची मंडळी या सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं. सर्वांशी चर्चा केली. त्यावर सासू आपल्या धाकट्या मुलाशी मंजीत याच्याशी आपल्या विधवा सुनेशी विवाह लावून देण्यास राजी झाली.

दोन्हीकडच्या मंडळींनी होकार दिल्यावर पोलिसांनी थेट पोलीस स्टेशनमध्येच मांडव रचला. पंडितआणि स्थानिक बँडवाल्यांना बोलावून घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्येच विधवा सुनिताचं दीर मंजीत यांच्याशी विवाह संपन्न करवून दिला. यामुळे एका विधवेला पुन्हा आपलं सासरही मिळालं आणि जीवनसाथीही.

केवळ सासरच्यांना समज देऊन किंवा शिक्षेची भीती दाखवून प्रश्न सोडवण्याऐवजी पोलिसांनी अत्यंत संयमाने हे प्रकरण हाताळत विधवेचा संसार नव्याने उभा केला.

Exit mobile version