Fri. Sep 17th, 2021

समलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा

प्रेम त्रिकोणातून घडलेल्या हत्या आपण यापूर्वी ऐकल्या वाचल्या असतील. अलिगढमध्येही अशाच कारणाने हत्या घडली आहे. मात्र त्यात एक वेगळीच बाजू पुढे आली आहे. आपल्याच्या भाडेकरूच्या पत्नीशी समलिंगी संबंध ठेवता यावेत म्हणून महिलेने आपल्या पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे.

अलिगढच्या कुंवरनगर येथे भूरीसंग गोस्वामीचा मृतदेह नाल्यात आढळून आला होता. त्याचे हातपाय दोरीने बांधले होते. त्याची गळा दाबून हत्या केल्याचं पोस्ट मॉर्टममधून समजलं होतं.त्याची पत्नी रुबी हिच्याकडे चौकशी केल्यावरही संशय आला नव्हता. मात्र भूरीसिंगच्या भावाने रुबीवर तसंच त्यांचा भाडेकरू हरिओम आणि त्याची पत्नी रजनी यांच्यावर आरोप केला. रुबीचे हरिओमशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय होता. मात्र चौकशीअंती भलताच खुलासा झाला. रुबीचे हरिओमचे नव्हे, तर हरिओमची पत्नी हिच्याशीच समलैंगिक संबंध असल्याचं निष्पन्न झालं.

भूरीसिंगला आपल्या पत्नीच्या समलिंगी संबंधांबद्दल समजल्यावर त्याने आक्षेप घेतला. त्यामुळे रुबी आणि रजनी दोघांनी मिळून भूरीसिंगला मार्गातून हटवण्याचा प्लॅन बनवला.

होळीला भूरीसिंगला रुबीने खूप दारू पाजली. तो नशेत बुडाल्यावर त्याचा गळा दाबून हत्या केली. मग त्याचे हातपाय बांधून त्याचा मृतदेह जाणीवपूर्वक भूरीसिंगच्या भावाच्या घराजवळील नाल्यात फेकला. त्यामुळे भूरीसिंगच्या भावावर संशय येईल असा त्यांचा अंदाज होता.

मात्र पोलिसांनी सत्य शोधून काढलं आणि रुबी आणि रजनी दोघींना अटक केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *