Sat. Mar 28th, 2020

पती UPSCच्या तयारीत गुंग, पत्नीने मागितला घटस्फोट

एका महिलेनी आपल्या पतीशी घटस्पोट घ्यायचे कारण हे सांगितले आहे की, तो सतत आपल्या UPSC च्या आभ्यासात व्यस्त असतो.

सध्या घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ होत असताना अनेकदा क्षुल्लक गोष्टींवरून वादामुळे घटस्फोट घेत असल्याचे उघडकीस आले आहे. असाच एक प्रकार मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे घडला आहे. पती पूर्णवेळ  UPSCचा अभ्यास करत असल्यामुळे त्याला वैतागून पत्नीने चक्क घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. भोपाळ येथील कटारा हिल्स येथे हे जोडपं राहत असून पती आपल्याला वेळ देत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे पत्नीने सांगितले आहे.

UPSC परिक्षेमुळे संसार धोक्यात ?

मध्य प्रदेशच्या भोपाळ येथील कटारा हिल्स येथे राहणाऱ्या एका जोडप्याने एका आगळ्या-वेगळ्या कारणाने घटस्फोट घेतल्याचे समजते आहे.

पती पूर्णवेळ UPSC परिक्षेचा अभ्यास करत असल्याने आपल्याला अजिबात वेळ देत नसल्यामुळे घटस्फोट घेत असल्याचे पत्नीने सांगितले आहे.

दोन वर्षांपूर्वी या दोघांचे लग्न झाले असून पती कधीच फिरायला घेऊन जात नसून शॉपिंग किंवा चित्रपट दाखवण्यासाठी घेऊन जात नसल्याचे म्हटलं आहे.

दिवसभर आपल्या रुममध्ये अभ्यास करत असून कधीच पत्नीशी बोलत नसल्याचेही पत्नीने सांगितले आहे.

माहेरी गेल्यावर कधीच कॉल करत नसल्यामुळे पत्नीला या सर्व गोष्टीचा कंटाळा आल्यामुळे घटस्फोटचा मार्ग निवडला असल्याचे तिने सांगितले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *