Mon. May 17th, 2021

‘तो’ होता ‘तिच्या’सोबत, तेव्हाच आले पत्नी, सासू आणि सासरे

आपला नवरा मैत्रिणीसोबत असल्याचे बघून पत्नीसह सासू आणि सासऱ्याने मिळून पतीची धुलाई केली आहे. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथील खळेवाडी येथे घडली आहे. या मारहाणीत पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं ?

पत्नी माहेरी गेली असताना पती आपल्या मैत्रिणीसोबत भिंगार येथील घरी होता.

पत्नी आपल्या आई, वडिलांसोबत अचानक घरी आल्यावर आपल्या पतीला  मैत्रिणीसोबत बघितल्यामुळे पत्नीचा संताप झाला.

या रागाच्या भरात पत्नीसह सासू सासऱ्यांनी मिळून पतीची चांगलीच धुलाई केली.

तु ही मुलगी ठेवली आहे का ? असा प्रश्न विचारत जावयावर शिवीगाळ केली.

तसेच सासऱ्याने जावयाच्या पाठीवर, छातीवर आणि गळ्यावर चाकूने वार केले.

सासऱ्याने वार केल्यामुळे जावई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पतीने पोलिसांत धाव घेतली असून पत्नी, सासू, सासरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *