Mon. Jul 22nd, 2019

पत्नीला पकडले प्रियकरासोबत रंगेहाथ; प्रियकराने उचललं ‘हे’ पाऊल

0Shares

दिल्लीच्या जे.जे कॉलनीमध्ये पतीने आपल्या पत्नीसह तिच्या प्रियकरला रंगेहाथ पकडले. त्यानंतर पतीने दोघांना खोलीमध्ये डांबून ठेवले. या घटनेमुळे पतीने पत्नीला बेदम मारहाणही केली. पत्नीला मारहाण करत असल्यामुळे आपलं काही खरं नाही या भावनेने प्रियकराने स्वत: चा जीव वाचवण्यासाठी ईमारतीच्या 5व्या मजल्यावरून उडी मारली आहे.

नेमकं काय घडलं ?

दिल्लीमध्ये लग्न झालेल्या प्रेयसीसोबत पंकज नामक तरूणाचे प्रेमसंबंध होते.

मंगळवारी पती नसल्याची माहिती पंकजला मिळाल्यानंतर तो प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला.

मात्र त्याचवेळी प्रेयसीचा पती घरी आला.

बेडरूममध्ये शिरताच पतीसमोर धक्कादायक दृश्य दिसल्याने तो हादरला.

पत्नीला दुसऱ्यासोबत बघून तो संतापला आणि पत्नीला कानशीलात मारली.

यामुळे पत्नीने हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला.

मात्र पत्नी नाटक करत असल्याचे समजल्यावर पतीने पत्नीला प्रियकराला खोलीत डांबून ठेवले.

तसेच पतीने पत्नीच्या कुटुंबियांना बोलवत असल्याची धमकी देत दरवाजा बंद केला.

या भीतीपोटी पंकजने बाल्कनीतून ईमारतीच्या 5व्या मजल्यावर जाण्याचे ठरवले.

मात्र तिथेच त्याला प्रेयसीचा नवरा दिसल्यामुळे त्याने 5व्या मजल्यावरून उडी मारण्याचा निर्णय घेतला.

गेल्या दोन वर्षापासून पंकज आणि पत्नीसोबत संबंध असल्याचे समजले आहे.

पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

 

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: