Mon. May 10th, 2021

पत्नी लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांनी केला छळ; विवाहितेची आत्महत्या

प्रत्येक पतीला सुंदर पत्नी मिळावी अशी ईच्छा असते. मात्र पत्नी फक्त लठ्ठ असल्यामुळे पती आणि सासरच्या लोकांनी चक्क तिला त्रास दिला. या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पिंपरी चिंचवड येथील भोसरी भागात घडली आहे.

नेमकं काय घडलं ?

पिंपरी चिंचवडमध्ये एका विवाहित महिलेने सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली.

प्रियांका पेटकर असं या आत्महत्याकर्त्या महिलेचे नाव असून केदार पेटकर तिच्या पतीचे नाव आहे.

प्रियांका आणि केदारचे 2014 साली लग्न झाले होते.

मात्र प्रियांका लठ्ठ असल्यामुळे तिला टोमणे मारणे तसेच तिला अनेक दिवस उपासमार करण्यास भाग पाडणे असा छळ करत होता.

प्रियांका लठ्ठ असल्यामुळे सासरकडच्यांनी तिचा मानसिक छळ केला.

तसेच तिला पुन्हा माहेरी सोडून आल्यामुळे प्रियांका मानसिक तणावात होती.

त्यामुळे या गोष्टींना कंटाळून प्रियांकाने गळफास लावून आत्महत्या करण्याचा निर्णय घेत जीवन संपवले.

सासरच्या लोकांविरोधात प्रियांकाच्या भावाने भोसरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *