Fri. Sep 30th, 2022

पत्नीने केली पतीची हत्या

पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यामध्ये घडली आहे.  हत्या केल्यानंतर हात-पाय तोडून जाळले. शीर पूर्ण जळलं नाही म्हणून रेल्वे परिसरात फेकून दिलं. या घटनेने वर्धा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आरोपी पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनिल मधुकर बेंदले वय ४६ असा मृतकाचं नाव तर मनीषा बेंदले असं आरोपी पत्नीचं नाव आहे.

वर्ध्यातील देवळी तालुक्यातील पुलगाव येथील हिंगणघाट फैल येथील राहणाऱ्या अनिल मधुकर बेंदले वय ४६ वर्ष याची शुक्रवारी रात्री पत्नीने हत्या केली व त्याच्या मृतदेहाची तुकडे करून मुलाच्या मदतीने ऑटोमध्ये पुलगाव वरून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मलकापूर बोधड या मूळ गावात नेऊन मृतदेहाचे तुकडे जाळण्यात आले. तर शीर हे पूलगाव रेल्वे परिसरात फेकले. मृतकाचे शिर हे दोन दिवसाअगोदर पुलगावातील रेल्वे स्टेशनच्या बाजूला एका झुडपात आढळले होते. पोलिसांनी तपासचक्र फिरवीत खुनाचा उलघडा केला. खुनामागे पत्नी असल्याचे असल्याचे पुढे आले.

 या घटनेत आरोपी पत्नी ही कराटे प्लेयर असून मृतक हा आधी होमगार्ड मध्ये कार्यरत होता. दोन वर्षांपूर्वी आंदोलनादरम्यान तो निलंबित झाला होता. त्यानंतर तो रोज मजुरी करायचा आणि तो दारू पिण्याचे सवयीचा होता. म्हाताऱ्या सासऱ्याने बॅगमध्ये काय आहे? असे विचारले असता जुने कपडे जाळायला आणले असे मनीषाने सांगितले. पुलगाव पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला असून मृतकाची पत्नी मनीषा आणि मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनेचा संपूर्ण तपास, आरोपींची चौकशी झाल्यानंतर हत्या का केली याचा उलगडा होईल. पोलिसांनी मृतकाच्या शरिराचे अवशेष ताब्यात घेऊन फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहे. या हत्याकांडाने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून इतक्या क्रूरपणे पत्नी पतीची हत्या कशी करू शकते अशी चर्चा रंगत आहे. पत्नी कराटे चॅम्पियन आहे. उपविभागीय अधिकारी गोकुळसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक शैलेश शेळके, राजू हाडके, खुशाल राठोड, संजय पटले, पंकज टाकोने, महादेव सानप, शरद सानप पुढील तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.