Wed. Jun 26th, 2019

नवऱ्याचं मुंडकं प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन ‘ती’ पोलीस स्टेशनला!

0Shares

आपल्या नवऱ्याची हत्या करून त्याचं मुंडकं घेऊन एक महिला पोलीस स्टेशनला पोहोचल्याने चांगलीच खळबळ माजली. आसामच्या लखीमपूर येथे ही थरारक घटना घडली. गुणेश्वरी बार्काटाकी असं या 48 वर्षीय महिलेचं नाव आहे.

हत्येचं कारण?

पती मुधीराम हा वर्षानुवर्षं आपला शारीरिक तसंच मानसिक छळ करत असल्याचा दावा गुणेश्वरी हिने केला आहे.

लग्नानंतर वारंवार पती आपल्याला मारहाण करत असे.

अनेकदा या मारामुळे आपण जखमी झाल्याचंही गुणेश्वरी हिने म्हटलं.

अशा विकृत पतीला सोडण्याचा विचार गुणेश्वरी पूर्वीपासून करत होती.

मात्र आपल्या 5 मुलांचा विचार करून ती नवऱ्यापासून विभक्त झाली नाही आणि त्याचे अत्याचार सहन करत राहिली.

अखेर तिच्या यातनांचा कडेलोट झाला आणि आपल्या 55 वर्षीय पतीचा गळा चिरून तिने हत्या केली.

आपण आपल्या पतीची हत्या केली नसती, तर त्याने माझी हत्या केली असती, असा आरोप तिने केलाय.

नवऱ्याला चिरलेलं मुंडकं एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून गुणेश्वरी 5 किलोमीटर दूर असणाऱ्या धालपूर पोलीस स्टेशनला ती पोहोचली. या घटनेमुळे पोलीसदेखील संभ्रमित झाले. आता स्थानिक न्यायलयाने गुणेश्वरीला न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: