Tue. Jun 18th, 2019

सतत यूट्यूब व्हिडीओ बघण्यामुळे पतीकडून पत्नीचा खून

35Shares

पत्नी सतत यूट्यूब व्हिडीओ बघत असल्याने या रागातून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. ही घटना अंधेरी एमआयडीसी परिसरात बुधवारी पहाटे घडली असून पतीने स्वत: याची कबुली पोलीसात दिली आहे. आरती चौगुले (२४) असे या मृत महिलेचे नाव आहे तर  चेतन चौगुले (३०)  असे पतीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकाराची माहीती दिल्याने हे प्रकरण उघडकीस आला आहे.  याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

एमआयडीसी कामगार वसाहतीमध्ये चेतन चौगुले हा आई-वडील, पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलासह  वास्तव्यास आहे.

चेतन सध्या कोणताचं व्यवसाय करीत नसल्याने आणि यूट्यूबवरून पती- पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते.

मंगळवारी आरतीने आणि चेतनमध्ये किरकोळ कारणावरुन  जोरदार भांडण झाले.

रात्री उशिरापर्यंत भांडल्यानंतर चेतन झोपून गेला मात्र आरती युट्यूबवर व्हिडीओ बघत बसली.

पहाटे चारच्या सुमारास चेतन उठला असता आरती यूट्यूबवरच व्हिडिओ बघत होती.

हे पाहून चेतनला राग आवरला नाही आणि  त्याने नायलॉनची रस्सी घेऊन आरतीचा गळा आवळला.

आरतीची हालचाल बंद झाल्याने तीचा मृत्यू झाल्याचे त्याच्या लक्षात आले.

पाहून पहाटे साडेचारच्या सुमारास त्याने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले आणि हा सर्व प्रकार सांगितला.

35Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *