Mon. Jul 22nd, 2019

पत्नीला दारू आणण्यास उशीर झाला म्हणून पतीकडूनच हत्या

0Shares

आपण नेहमी बघत आलो आहे की पत्नी नेहमी आपल्या पतीला दारू पिण्यासाठी रोखत असते. मात्र पत्नीला दारू आणण्यास पाठवलं आणि तिला दारू घेऊन येण्यास उशीर झाला म्हणून तिची मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक  घटना मुंब्रामध्ये घडली आहे. या घटनेत आरोपी प्रविण पुरबिया याला पत्नीची हत्या केल्याप्रकरणी  मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं घडल कायं ?

आरोपी  प्रविण पुरबिया याने कामावरून आल्यानंतर आपली पत्नी संतोषी हिला दारू आणण्यासाठी पाठवलं होत.

मात्र, तिला दारू घेऊन येयला उशीर झाला. यामुळे त्याने तिच्याशी वाद घातला.

तसेच तिला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यातच तिचा मृत्यू झाला.

हे पुरबिया कुटुंबीय मुंब्रा भागात राहते. विशेष म्हणजे ही घटना त्यांच्या मुलासमोर घडली  आहे.

आरोपी  प्रविण पुरबिया याने स्वत: आपल्या पत्नीचा मृत्यू औषध प्यायल्यामुळे झाला आहे. अशी तक्रार मुंब्रा पोलीस स्थानकात दिली .

मात्र, पोलीसांना या  तपासात आरोपी प्रविण पुरबिया यानेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले.

आरोपी प्रविण पुरबिया याला पत्नीची हत्या केल्याप्रकरणी  मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेबद्दलचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: