Sat. Mar 28th, 2020

पत्नी खाण्यासाठी फक्त लाडू देते; पतीची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव

सध्या घटस्फोटाचे प्रमाण वाढत असताना उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे पतीने एका वेगळ्याच कारणाने घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. पत्नी खाण्यासाठी फक्त लाडू देत असल्याने पतीने न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेतली आहे. मांत्रिकाच्या सांगण्यावरून खाण्यासाठी लाडू देत असल्याचे पतीचे म्हणणं आहे.

नेमकं प्रकरण काय ?

उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये पतीने पत्नी फक्त जेवणाला लाडू देत असल्यामुळे न्यायालयात धाव घेतली आहे.

10 वर्षांपूर्वी या दांपत्याचं लग्न झाले असून त्यांना तीन मुलं आहेत.

काही दिवसांपासून पती आजारी असल्यामुळे पत्नीने मांत्रिकाशी संपर्क साधला.

मांत्रिकाने फक्त लाडू खायला घाला असा सल्ला दिला आहे.

या मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार पत्नी जेवताना लाडू देत असल्याचा आरोप लावला आहे.

सकाळी चार आणि संध्याकाळी चार लाडू खायला पत्नी देते.

तसेच त्याऐवजी काहीच खायला देत नसल्याचे पतीने म्हटलं.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *